तापाची कणकण म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:28

तापाचे मुख्य प्रकार तीन आहेत :

सतत राहणारा ताप

सतत ताप म्हणजे आजाराच्या काळात अजिबात न उतरता कायम राहिलेला ताप. हा ताप विषमज्वर, कावीळ  वगैरे आजारांमध्ये आढळतो.
कमीजास्त होणारा ताप

आजाराच्या काळात एकदम चढणारा व एकदम पूर्णपणे (किंवा अर्धवट) उतरणारा ताप माहिती विचारून ओळखता येतो. थंडीताप याच प्रकारात येतो. यात आधी थंडी वाजते मग ताप येतो. मलेरिया, न्यूमोनिया,मूत्रपिंडाचा जंतुदोष, किंवा कोठेही पू असल्यास असा  ताप दिसून येतो.
मुरलेला ताप

हे नाव चुकून पडले आहे. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. मात्र आधुनिक उपचारांमुळे याचे प्रमाण आता पुष्कळ कमी झाले आहे.






तापाचे इतर अनेक प्रकार :

तापाचे प्रकार ? ताप का येतो

विषाणूजन्य ताप
जसे बर्ड फ्लू, एच१एन१, एच२एन२. मात्र विषाणू अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. मुंबईत गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने असे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे विषाणूजन्य तापाकडे दुर्लक्ष न करणेच योग्य.

किटाणूंमुळे होणारा संसर्ग
हा ताप डास चावल्याने येतो. उदा. मलेरिया, डेंग्यू. मलेरियाचे तीन प्रकार असून, डेंग्यूचे चार प्रकार आहेत. मलेरियामध्ये एका विशिष्ट वेळेला ताप येतो. डॉक्टरांकडून योग्य उपचार न घेतल्यास हा विकार बळावू शकतो.

जंतुसंसर्गामुळे येणारा ताप
जंतूचा संसर्ग झाल्याने ताप येतो. उदा. टायफाइड, न्यूमोनिया, टीबी, लेप्टोस्पायरोसिस.

निदान न होणारा ताप
ताप येण्याची कारणे सामान्य असली, तरी काही तापाचे निदानच होत नाही. विविध उपचार केले, तरी ताप बरा होत नाही. त्याची मुदत दोन आठवड्यांपेक्षा अधिक राहते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info